एमपीएससीच्या परीक्षा 6 जूनपासून

April 30, 2011 2:00 PM0 commentsViews: 5

30 एप्रिल

महाराष्ट्र लोकसेवाआयोगा मार्फत घेतल्या जाणार्‍या मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या. त्यानुसार यंदा एमपीएससीची मुख्य परीक्षा 6 ते 10 जून आणि 14 ते 22 जून दरम्यान आहे. पण यादरम्यान केंद्रीय लोकसेवा आयोगाची निश्चित असलेली पूर्वपरीक्षाही घेतली जाणार आहे. 12 जून रोजी घेतल्या जाणा-या लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षा आणि 6 ते 22 जूनदरम्यान होणार आहे.

या दोन्ही परीक्षांचे वेळापत्रक एकाच महिन्यात आल्यामुळे विद्यार्थांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग त्यांच्या परीक्षा वेळापत्रक एक वर्ष आधीच घोषित करते. हे माहीत असतानाही राज्य लोकसेवा आयोगाने असा निर्णय का घेतला. असा सवाल विद्यार्थी विचारत आहेत. तर दुसरीकडे ज्या विद्यार्थ्यांना ह्या दोन्ही परीक्षेला बसण्यासाठी शेवटची संधी आहे त्या विद्यार्थ्यांना संधी हुकेल अशी भीती वाटतेय.

close