स्पेक्ट्रम घोटाळ्यातील आरोपींना सरकारचा वाचवण्याचा प्रयत्न !

April 30, 2011 6:23 PM0 commentsViews: 4

30 एप्रिल

2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील आरोपींना सरकार वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप लोकलेखा मुरली मनोहर जोशी यांनी केला आहे. त्यांनी आज लोकलेखा समितीचा अहवाल लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांच्याकडे सोपवला. या अहवालात पंतप्रधान कार्यालयावर ताशेरे ओढण्यात आले होते.

या अहवालाला काँग्रेस, द्रमुक, समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज 11 पक्षाच्या सदस्यांनी विरोध केला होता. आणि जोशी यांनी अहवाल तयार करताना विश्वासात घेतलं नसल्याचा आरोप केला होता. त्यावर आपल्यावरचे सर्व आरोप निराधार असल्याचे मुरली मनोहर जोशी यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. अहवाल या महिन्याच्या अखेरपर्यंत सादर करायचा, असं 4 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत लोकलेखा समितीच्या सर्व सदस्यांनी मान्य केलं होतं, अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान, हा अहवाल नाकारला गेला तर त्याविरोधात आक्रमक भूमिका घेण्याची तयारी भाजपनं केल्याची माहिती सूत्रांनी दिली. संसदेतल्या सर्व समितींवर बहिष्कार टाकण्याचा किंवा सदस्यपद सोडण्याचा इशारा भाजपने दिला आहे.

close