युवराज कांबळेला न्यायालयीन कोठडी

April 30, 2011 2:13 PM0 commentsViews: 1

30 एप्रिल

कोल्हापुरातल्या महिला पोलीस बलात्कार प्रकरणातला संशयित आरोपी हेड कॉन्स्टेबल युवराज कांबळेला आज कोर्टाने न्यायालयीन कोठडी दिली आहे. कोल्हापूर पोलीस दलातल्या महिला कॉन्स्टेबलच्या बलात्कार प्रकरणात युवराज कांबळेला अटक करण्यात आली होती. त्याची आज पोलीस कोठडी संपल्याने त्याला कोर्टाने 12 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. युवराजची पोलीस कोठडी वाढवून मिळावी अशी मागणी सरकारी पक्षाकडून केली जात होती. पण न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

close