महाराष्ट्र दिनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा !

May 1, 2011 9:24 AM0 commentsViews: 29

01 मे

आज महाराष्ट्र दिन मोठ्या जल्लोषमय वातावरणात साजरा होत आहे तसेच महाराष्ट्र दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा देण्यासाठी सरकारतर्फे वृत्तपत्रांमध्ये जाहिराती दिल्या जातात. पण एका वृत्तपत्रात माहिती आणि जनसंपर्क खात्यातर्फे देण्यात आलेल्या जाहिरातीत चक्क प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोंसह महाराष्ट्र दिनाऐवजी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. दरम्यान माहिती जनसंपर्क खात्याने ही आपली चूक नसून संबंधित वृत्तपत्राची चूक असल्याचं स्पष्टीकरण दिले आहे. माहिती संचालक विजय नाहाटा यांनी हे स्पष्टीकरण दिलं. आम्ही शेकडो वृत्तपत्रांसाठी एकच जाहिरात दिली होती, पण एकाच वृत्तपत्रात ती चुकीची आली असंही नाहाट यांनी म्हटले आहे.

close