नक्षलवाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ – गृहमंत्री

May 1, 2011 9:31 AM0 commentsViews: 5

01 मे

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने गडचिरोलीमध्ये गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. नक्षलवाद्यांना त्यांच्याच भाषेत चोख उत्तर देऊ, असा इशारा गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी दिला. कुठलीही क्रांती बंदुकीच्या जोरावर यशस्वी झाली नाही असंही ते म्हणाले. गडचिरोली जिल्हा आता मागासलेला राहणार नाही अशी ग्वाहीही त्यांनी दिली. पुण्यातही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलंय.

गडचिरोलीत शासकीय ध्वजारोहण करण्यात आल्यानंतर गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी गडचिरोली जिल्ह्यातील घोट या नक्षलप्रभावी भागाचा दौरा केला. गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी पहिल्यांदाच आदिवासींच्या जनजागरण मेळाव्यात हजेरी लावली.आदिवासींच्या मनातून नक्षलवाद्यांची भीती जावी आणि आदिवासींनी पोलिसांना मदत करावी यासाठी हे पाऊल अत्यंत महत्वाचं आहे. या भागात जाणारे आर.आर.पाटील हे पहिले गृहमंत्री आहेत.

close