दुबईत मराठीबाणा जपणारा एक मसालेवाला

May 1, 2011 11:06 AM0 commentsViews: 17

संदीप चव्हाण, मुंबई

01 मे

अमरावतीचा एक मुलगा गरीबीचे चटके सहन करत मोठ्या हिंमतीने आपलं शिक्षण पुर्ण करतो. करिअर करण्यासाठी दुबई गाठतो. काबाड कष्ट करतो. पारंपारिक नोकरीऐवेजी बिझनेस करायचा धोका पत्करतो. आणि त्यात अब्जावधी रुपयांची उलाढाल करुन दाखवतो. मसाला किंग धनंजय दातार यांची ही प्रेरणादायी कहाणी…

श्रमांच मोल सांगतानाचा आनंद धनंंजय दातार यांच्या चेहर्‍यावर सहज वाचता येतो. दातार आज मसाला किंग म्हणून ओळखले जातात. युएईमध्ये त्यांच्या मालकीच्या 16 कंपन्या आहेत. अब्जोरुपायंाची उलाढाल असणार्‍या अल अदिल ट्रेडिंग कंपनीचे सर्वेसर्वा असणार्‍या दातारांचा हा प्रवास व्यवसायात शिरु पाहणार्‍या मराठी युवकांसाठी प्रेरणादायी असाच आहे.

अमरावतीतील शिरपुरच्या शाळेत दातारांच प्राथमिक शिक्षण झालं. तब्बल चाळीस वर्षानतंर ते पुन्हा या शाळेत आले ते प्रमुख पाहुणे म्हणून. आणि मग सुरू झाला तो आठवणींचा थक्क करणारा प्रवास. गरीबीवर मात करून शिक्षण घेणार्‍या दातारांनी वयाच्या वीसाव्या वर्षी वडिलांसह दुबई गाठली. अल अदिल समूह संस्थापक धनंजय दातार म्हणतात, मी खांद्यावर पोती घेऊन डिलिव्हरी करायचो. झाडू पोचा करायचो. वडिल जेवण बनावायचे मी त्यांना भाजी कापून द्यायचो, कितीतरी दिवस आम्ही डाल रोटीवर काढलेले आहेत.

याच कष्टातून दातार यांच्यातील उद्योजक घडत गेला. आणि धनंजय दातार यांनी स्वत:ची मील उभारली आणि या मिल मध्ये त्यांनी स्वत: दळण ही दळलं. आणि विशेष म्हणजे आम्हची कुठेही शाखा नाही ही टीपिकल मराठी मानसिकता त्यांनी युएईत जुगारून दिली. बघता बघता दुबईभर सगळीकडे शाखा आहे.

उत्पादन वाढवतानाच त्यांनी क्वालिटीकडे दुर्लक्ष केले नाही. म्हणूनच पिकॉक हा ब्रँड म्हणजे क्वालिटीचं दुसरं मापदंड मानलं गेलं. याबद्दल धनंजय दातार म्हणतात, आज मी जो काही आहे तो या पिकॉक ब्रँड मुळे. एकाप्रकार देशी स्वाद त्यांनी जपला. यामुळेच दातार यांच्या ग्राहकांच्या यादीत एमिरात एअरलाईन्सपासून ते युएईतील फाईव्हस्टार हॉटेलची नावही झळकू लागली.

शेख अहमद बिन साईद अल मकतुल यांनी दिलेलं प्रशस्तीपत्रक दातार यांच्या कर्तृत्वाची साक्ष देत होती. दोन दुकानांपासून सुरुवात केली होती ती आज 16 कंपन्या आहेत. स्वाद जगभर पोहचावयाचा आहे. मेंहदीच्या पानांपासून ते आकाश कंदीलापर्यंत. तोरणांपासून ते मराठमोळ्या पदार्थंापर्यंत सारं काही अल अदिल सुपर मार्केटमध्ये उपलब्ध असतं. मराठी माणसाची हीच अस्मिता दातार यांनी दुबईत जपली आहे. आणि हो उद्योगातही.

पैसा कमावत असतानाच दातार यांनी सामाजिक बांधिलकी ही जपली. पहिलं वहिलं विश्व साहित्य संमेलन दातारांच्या पुढाकारातूनच दुबईत साकारलं. आणि म्हणूनचं महाराष्ट्र दिनानिमित्त दातार यांनी तमाम मराठी युवकांना साद घातली. दातार याबद्दल म्हणतात, माझ्याकडे आज 320 मराठी वर्कर्स आहेत. कारण मराठी माणसं प्रामाणिक असतात. आपला जन्म नोकरीसाठी झाला हे विसरून जा आणि बिझनेस करा.

close