वैमानिकांचा संप चिघळला ; 75 टक्के फ्लाईट्स रद्द

May 1, 2011 11:49 AM0 commentsViews: 2

01 मे

एअर इंडियाच्या पायलट्सच्या संपाचा आज पाचवा दिवस उजाडला आहे. आयसीपीए मॅनेजमेंटने संपकरी पायलटशी कोणती चर्चा केली नसल्यामुळे हा संप चिघळला आहे. या संपामुळे जवळपास 75 टक्के फ्लाईट्स रद्द करावी लागली आहेत. तर सुमारे सव्वीस कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. एअर इंडियाचे आठशे पायलट्स संपावर आहेत. मॅनेजमेंटने इतर खासगी विमान कंपन्यांचे पायलट भाडे तत्वावर घेतले आहेत. पण ही तरतूद अपुरी असल्यामुळे सर्वसामान्या प्रवाश्यांचे मात्र हाल होत आहे. तर दुसरीकडे हा संप मोडून काढण्यासाठी एस्माचा बडगा उगारला आहे. पण संपकरी पायलटस् आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

close