शिवाजी पार्कवर महाराष्ट्र दिनी शानदार संचलन

May 1, 2011 12:06 PM0 commentsViews: 5

01 मे

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मुंबईत शिवाजी पार्कवरही विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या हस्ते इथं ध्वजवंदन करण्यात आलं. यावेळेस फायरब्रिगेड, मुंबई पोलीस, दंगल नियंत्रण पथक, फोर्स वन यांच्या गाड्यांनी शानदार संचलन केलं. तसेच मुंबई पोलीस, एनसीसी, स्काऊट, गाईड यांनीही संचलन केलं. नौदल आणि लष्कराच्या मुंबई विभागातील सैनिकही या संचलनात सहभागी झाले होते. यावेळेस एका चित्ररथाद्वारे राज्याच्या संस्कृतीचे दर्शन घडवण्यात आलं.

close