तेल विहिरींचा मराठी राजा !

May 1, 2011 4:57 PM0 commentsViews: 5

विनायक गायकवाड, मुंबई

01 मे

पेट्रोलियम जगतातील प्रभावशाली शंभर व्यक्तीत एका मराठी उद्योजकाचे नाव आहे. तेल निर्मितीच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या संशोधनाने क्रांती घडवून आणली आहे. मुळचे मुंबईकर असणार्‍या सदानंद जोशींनी अमेरिकेत अब्जोवधी रुपयांचे साम्राज्य उभं केले आहे. आपल्या या यशातील महाराष्ट्राचा वाटा ते अजुनही विसरलेले नाहीत.

पेट्रोल आणि गॅस या इंधनांनी आपलं रोजचं जीवन व्यापलंय. या इंधनाची निर्मिती म्हटलं की आठवतात ते मैलोन मैल पसरलेल्या वाळवंटाखालील तेलसाठे आणि या त्याजोरावर श्रीमंत झालेले अरब. पण अब्जोवधींची उलाढाल असलेल्या या पेट्रोलियम उद्योग जगतात एका मराठी उद्योजकानंही आपला ठसा उमठवला.

एक दोन नव्हे तर जगभरात तब्बल 250 तेल विहीरी या मराठी उद्योजकाच्या मालकिच्या आहेत. शास्त्रज्ञ ते ऑईल किंग हा महाराष्ट्राच्या सदानंद जोशी यांचा प्रवास म्हणजे अफाट जिद्दीची यशोगाथा आहे. जोशी टेक्नॉलॉजिस् इंटरनॅशनल म्हणजेच जेटीआय हा ऑईल जगतातील यशाचा नवा मानदंड ठरतोय. धाडस हे जोशी यांच्या यशाचं रहस्य.

ठाण्याच्या न्यु इंग्लिश हायस्कुलमध्ये जोशी यांच शिक्षण झालं. त्यानंतर सांगलीतील वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजमधून त्यांनी मॅकेनिकल इजिंनिअरिंगची पदवी घेतली. आणि मग गाठली ती थेट अमेरिका. जोशी कुटुंबात तोवर कुणीही बिझनेस केला नव्हाता. तरीही त्यांनी हे चॅलेंज स्वीकारले. आणि धाडसाने पहिली विहीर खरेदी केली. ऑईल निर्मितीतील ' होरिझंटल वेल टेक्नॉलॉजी' सदानंद जोशी यांनी विकसित केली.

जोशी यांच्या या संशोधनाची दखल अवघ्या जगाने घेतली. आणि त्यांचा ऑईल जगतातील 100 प्रभावशाली व्यक्तीमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला. जेटीआयनं गुजरातमधिल ढोलका आणि वॅवेल येथे तेलनिर्मिती सुरू केलीय.आपल्या या यशात जोशी महाराष्ट्राचे ऋण मात्र विसरत नाही.

close