मालेगाव बॉम्बस्फोटातला मुख्य आरोपी अजूनही फरार

November 10, 2008 5:16 AM0 commentsViews: 6

10 नोव्हेंबरमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एटीएसनं आतापर्यंत 9 जणांना अटक केली आहे. पण आतापर्यंत रामजी या आरोपीचा कोणताही ठावठिकाणा एटीएसला लागलेला नाही. लेफ्टनंट कर्नल प्रसाद यालाच रामजीचा ठावठिकाणा माहिती असावा अशी माहिती एटीएसच्या हाती लागली आहे.लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित याच्याभोवती एटीएसनं पाश आवळायला सुरुवात केली आहे. देशातल्या अन्य भागात झालेल्या बॉम्बस्फोटांमागेही या लोकांचा सहभाग असावा का, याची चौकशी एटीएसनं सुरु केली आहे. तपासात गती आणण्यासाठी या प्रकरणातला महत्वपूर्ण आरोपी रामजी चा शोध घेण्यासाठी एटीएस प्रयत्न करत आहे. मालेगाव बॉम्बस्फोटाचा कट आखणार्‍या रामजी बाबत एटीएसला आतापर्यंत काहीही माहिती मिळालेली नाही साध्वी प्रज्ञा आणि लेफ्टनंट कर्नल यांच्यानंतर रामजी हा या प्रकरणातला महत्वाचा दुवा आहे. पुरोहित यालाचं रामजीचा ठावठिकाणा माहिती असावा असा एटीएसला संशय आहे. एटीएस आणि सीबीआयला पुरोहित याच्यापासून बरीच माहिती मिळवायची आहे. नांदेडमध्ये बॉम्ब बनवतांना बजरंग दल आणि संघाच्या दोन कार्यकर्त्यांच्या झालेल्या मृत्यूप्रकरणाची चौकशी करणारी सीबीआय आता पुन्हा तपासाच्या कामात जोमानं लागली आहे.या प्रकरणी आता गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी कठोर भूमिका घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. ' ज्याप्रमाणे पुरावे मिळतील त्याप्रमाणे लष्कर, मंदीर, आश्रम, साधू, साध्वी अशा कोणाचाही विचार न करता योग्य कारवाई केली जाईल ' असं ते म्हणाले.मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास आता वेगळ्या वळणावर येवून पोहचला आहे. अनेक लोकांचं खरं रुप आता यानिमित्तानं समोर यायला लागलंय. त्यामुळे आता या निमित्तान दबाव तंत्रालाही सुरुवात झाली आहे. योग्या मार्गाने चाललेल्या तपासात काही लोक अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं आर आर पाटील यांनीही मान्य केलं.शेवटी या प्रकरणामध्ये कोण दबाव टाकतोय याचं नाव आर आर पाटील यांनी घेतलं नाही, पण या स्फोटामागे संघ परिवार आणि आणखी हिंदुत्ववादी संघटनांचाच हात असल्यानं दबावतंत्राचा वापर होत असल्याची चर्चा आहे.

close