रत्नागिरीत पार पडली सागरी जलतरण स्पर्धा

May 1, 2011 4:15 PM0 commentsViews: 5

01 मे

महाराष्ट्रदिना निमित्त आज रत्नागिरीत राज्य स्तरीय सागरी जलतरण स्पर्धा पार पडली. रत्नागिरीतील मिल्के स्वीमिंग ऍकॅडमी तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत राज्यतल्या पंधरा जिल्ह्यातील 200 स्पर्धंकानी सहभाग घेतला. रत्नागिरीच्या काळबादेवी समुद्रात पाच किलोमिटर आणि दोन किलो मिटर या गटात ही स्पर्धा घेण्यात आली. पाच किलो मिटर गटात रायगड जिल्ह्यातल्या कोमल सुर्वे हिने स्पर्धा जिंकली. स्वीमिंग टँकमध्ये पोहणार्‍या स्पर्धकांना समुद्रामध्ये पोहण्याचा नवीन अनुभवही या वेळी मिळाला. स्पर्धा पाहण्यासाठी रत्नागिरीकरांनीही गर्दी केली होती.

close