ताडोबाच्या जंगलात जिप्सी गाड्यांवर बंदी

May 1, 2011 4:20 PM0 commentsViews: 7

01 मे

ताडोबाच्या जंगलात गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या अवैध जिप्सी गाड्यांवर आजपासून बंदी घातली जाणार आहे. त्यामुळे जिप्सी चालकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. चंद्रपूरचे खासदार हंसराज अहिर ताडोबाची जंगल सफारी करायला आले होते. त्यांच्याशी जिप्सी चालकांनी शुल्लक कारणावरून वाद घातला.

जिप्सी चालक आणि बीजेपी कार्यकर्ते यांच्यात मारहाण झाली. यावरुन खासदार हंसराज अहिर यांनी आरटीओ आणि ताडोबा वनअधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीत जिप्सी चालक अनेक नियमांचे उलंघन करत असल्याचे स्पष्ट झालं. या प्रकरणानंतर ज्या जिप्सी चालकांकडे टुरिस्ट परवाना आणि गाडीचे कागदपत्र नाहीत त्यांना जंगल सफारी करण्यास मज्जाव करण्यात आला. ही बंदी आजपासून लागू होत आहे. या बंदीमध्ये 35 जिप्सींचा समावेश आहे.

close