एआयईईई परीक्षेचा पेपर फुटला एकाला अटक

May 1, 2011 12:34 PM0 commentsViews: 1

01 मे

देशभरात आज होणार्‍या एआयईईई अर्थात ऑल इंडिया इंजिनयरिंग एन्ट्रन्स एक्झामची वेळ अचानक बदलली गेली. पेपर फुटल्यामुळे ही वेळ बदलण्यात आली. सकाळी साडेनऊ वाजता पेपर होणार होता.तो पेपर 12 वाजता सुरु झाला. तर दुसरा पेपर दुपारी 4 वाजता सुरु झाला. परीक्षा केंद्रावर गेल्यावरच विद्यार्थ्यांना हा बदल कळला. परीक्षा सुरु होई पर्यंत परिक्षा केंद्रावर गोंधळ सुरुच होता. आज आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजचीही प्रवेश परीक्षा आहे. त्यामुळे या गोंधळात आणखी भर पडली. पेपर फुटी प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. तो एक पेपर सहा लाखाला विकत होता.

close