मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नवी मुंबईतील मेट्रो रेल्वेच भूमिपूजन

May 1, 2011 4:46 PM0 commentsViews: 1

01 मे

महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून आज नवी मुंबईत मेट्रो रेल्वेच्या भूमिपूजनाचा समारंभ पार पडला.मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा भूमिपूजनाचा समारंभ पार पडला. नवी मुंबईतील पहिला प्रकल्प बेलापूर ते पेंढार दरम्यान बांधण्यात येतोय. या मार्गावरच्या कामाला सुरुवात झाली. या प्रकल्पासाठी तब्बल 1984 कोटी रुपये खर्च होणार आहे. येत्या 2 वर्षात हा प्रकल्प पूर्ण होईल असा अंदाज आहे. भूमीपूजनाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांसोबतच पालकमंत्री गणेश नाईक, जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे उपस्थित होते.

close