लोकपाल समितीची बैठक शांततेत पार ; पुढची बैठक 7 मे रोजी

May 2, 2011 11:06 AM0 commentsViews: 2

02 मे

लोकपाल विधेयकाचा मसुदा निश्चित करण्यासाठी आज संयुक्त मसुदा समितीची दुसरी बैठक झाली. ही बैठक शांततेत पार पडली.लोकपाल बिलाची पुढची बैठक सात मे रोजी होणार आहे. पहिल्या बैठकीमध्ये सरकारी सदस्य आणि अण्णांचे प्रतिनिधी यांच्यात सलोख्याच्या वातावरणात चर्चा झाली होती.

मसुदा समितीच्या बैठकांचा ऑडिओ रेकॉर्डिंगचा निर्णयही घेण्यात आला होता. पण बैठक संपल्यानंतर काही तासातच दोन्ही गटांमध्ये तणाव निर्माण झाला होता. अण्णांनी आपली भूमिका नरम केल्याचा दावा कपील सिब्बल यांनी केला आणि काही वेळातच अरविंद केजरीवाल यांनी तो खोडून काढला होता.बैठकीच्या पार्श्वभूमीवर काल इंडिया अगेन्स्ट करपश्नने देशभरात ठिकठिकाण कॅण्डल मार्चचं आयोजन केलं होतं.

close