मीनाक्षी पाटील यांच्या घरावर हातोडा

May 2, 2011 12:45 PM0 commentsViews: 3

02 मे

मुंबई महापालिकेच्या नगरसेविका मीनाक्षी पाटील यांच्या घरातील अनधिकृत बांधकाम आज महापालिकेन तोडलं आहे. भांडुपला राहणार्‍या मीनाक्षी पाटील, महापालिकेच्या 111 वार्डच्या नगरसेविका आहेत.भांडुपला मिनीलँड भागात त्यांचा बंगला आहे. या बंगल्यात कार पार्किंगच्या जागेत, कॉक्रिटचे छत बांधण्यात आले होते.

या अनधिकृत बांधकामाची तक्रार, महापालिका आयुक्त सबोध कुमार यांच्याकडे करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत आयुक्तांनी अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार महापालिकेने पाटील यांच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडलं गेलं आहे.

close