लादेनचा मृतदेह समुद्राच्या तळाशी दफन !

May 2, 2011 3:38 PM0 commentsViews: 2

02 मे

ओसामा बिन लादेनचा मृतदेह समुद्राच्या तळाशी दफन करण्यात आला. मुस्लीम पध्दतीनं त्याचा दफनविधी पार पडल्याच वृत्त सीएननं दिले आहे. मृत्यूनंतर लादेनची कबर कट्टरवाद्यांचे श्रध्दास्थान बनू शकते हा धोका लक्षात घेऊन त्याचा मृतदेह समुद्राच्या तळाशी दफन करण्यात आला. दफनस्थळ नेमकं कुठं आहे याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. मुस्लीम पध्दतीने मुस्लीम धर्मगुरूंकडून ओसामावर सगळे अंत्यविधी करण्यात आले. त्याचा मृतदेह पांढर्‍याशुभ्र कपडयाने झाकण्यात आला होता.

close