क्रूरकर्मा लादेनचा अंत ; ट्विटरवर प्रतिक्रिया

May 2, 2011 5:55 PM0 commentsViews: 1

02 मे

अल कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आणि अमेरिकेवर हल्ला करणारा जगातला मोस्ट वान्टेड दहशतवादी ओसामा बिन लादेनचा अखेर अंत झाला आहे. याबद्दल टिवटरच्या माध्यमातून जगभरातील मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहे.

- नेल्सन मंडेला म्हणतात, 'आज फक्त अमेरिकेचाच नाही तर जे सगळे दहशतवादाविरुद्ध गेली अनेक वर्ष लढतायत त्यांचा विजय आहे.' – दलाई लामा – ओसामा बिन लादेन ठार झाला. जागतिक शांतीसाठी सर्वात महत्वाची गोष्ट घडली. -वेल घोनीम – 2011 हे वर्ष इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलं जाईल. आता तर फक्त मे महिना सुरु आहे, पण किती गोष्टी घडल्यात. ट्युनिशिया, इजिप्त, लिबिया, येमेन, सिरिया आणि आता लादेनचा अंत .

इम्रान खान – ओसामा बिन लादेन ठार झालाय. पाकिस्ताननं आता या वादातून लवकरात लवकर बाहेर पडलं पाहिजे. पाकिस्तानातील स्थानिक लोक हे दहशतवादात सहभागी नाहीत.

लॅरी किंग – अमेरिकेवरील दहशतवादी हल्ल्याला आता काही महिन्यांतच 10 वर्ष पूर्ण होतील आणि त्याअगोदरच ओसामा ठार झाला. ही खूप मोठी कामगिरी म्हणावी लागेल.

शेखर कपूर – नक्कीच अमेरिकेला ओसामा जिवंत हवा होता, पण थोडीफार चूक झाली. अपेक्षा करुयात भारत सरकार दाऊदला जिवंत पकडेल.

तुषार गांधी – ओसामा बिन लादेन अखेर ठार झालाय. ओबामांसाठी ही एकमेव मोठी कामगिरी आहे. म्हणजे ओबामा आता दुसर्‍यांदा निवडून येणार हे नक्की

महेश भट – सगळं जग सध्या ओसामा बिन लादेन ठार झाल्याचा जल्लोष करतंय. पण जगातल्या दुसर्‍या मोठ्या अतिरेक्याला म्हणजे 'जॉर्ज बुचर बुश' ला कोण पकडेल?

प्रितीश नंदी – ओसामा हा खूनी नव्हता, पण त्यानं इतरांना कत्तल करण्यासाठी प्रवृत्त केलं. पण ही प्रवृत्ती इतक्या लवकर संपेल का?

close