लादेनचा खात्मा पण परिणाम पाकपासून !

May 2, 2011 6:16 PM0 commentsViews:

02 मे

ओसामा बिन लादेनला मारल्यानंतर या लढ्याचा इथंच शेवट होत नाही. तर त्याचे परिणाम भविष्यात पाकिस्तान अधिक सोसावे लागणार आहेत. तर काश्मीरमधल्या दहशतवादी कारवायांमध्येही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जातेय.

क्रूरकर्मा ओसामा बिन लादेन तर मारला गेला. पण त्यानंतर आता त्याचे परिणाम सगळ्यात पहिल्यांदा पाकिस्तानात दिसून येतील. ज्याठिकाणी ओसामा बिन लादेन याला मारलं ते ठिकाण ओबाताबाद हे आयएसआयचे मुख्यालय असलेल्या रावळपिंडीजवळच आहे. एवढंच नाही, तर पाकिस्तान मिलिटरी ऍकॅडमीपासून केवळ एक किलोमीटर अंतरावरच हे ओसामाचं घर होतं.

जानेवारीत जेव्हा स्पेनचे जे दोन दहशतवादी पकडले गेले त्यांच्याकडून या सगळ्याचा उलगडा झाला. त्याच माहितीच्या आधारावर आजची कारवाई झाली. पण ही कारवाई करताना आम्हाला अंधारात ठेवलं गेलं. असा सूर आता पाकिस्तान सरकारनं लावला. पण ही कारवाई पाक सरकारच्या मदतीशिवाय शक्यच नाही असं जाणकारांचं म्हणणं आहे.

वजिरीस्तानमध्ये असलेलं अमेरिकी लष्कर ही कारवाई करण्यासाठी थेट इस्लामाबादपर्यंत पोहचलं आणि पाक सरकारला याची माहिती नसते असं होऊ शकत नाही. त्यावरून तेहरिक ए इन्साफ पक्षाचे प्रमुख इमरान खान यांनी अमेरिकी लष्कराविरोधात निदर्शनंही केली होती.

याचे पुढे भारतावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता आता वर्तवली जातेय. पुढच्या काळात काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या कारवायांमध्ये वाढ होऊ शकते. या घटनेमुळे मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत गृहमंत्री आर.आर. पाटील यांनीही या हल्ल्यात आयएसआयचाच हात होता, असा आरोप त्यांनी केला.

या कारवाईनंतर पुढचे काही दिवस पाकिस्तान तर धुमसत राहीलच पण यामुळे भविष्यात होणार्‍या दहशतवादी कारवायांकडे भारतालाही बारकाईनं लक्ष ठेवावे लागणार आहे.

close