इस्त्रोने बनवला सर्वाधिक वेगवान कॉम्प्यूटर

May 2, 2011 6:31 PM0 commentsViews: 94

02 मे

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोने सर्वाधिक वेगवान असा सुपर कॉम्प्यूटर बनवला आहे.काल या सुपर कॉम्प्यूटरचे उद्धघाटन इस्त्रोचे अध्यक्ष, डॉक्टर के राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. या सुपर कॉम्प्यूटरचे नाव सागा 220 असे करण्यात आले आहे. या आधीचा सुपर कॉम्प्यूटर पुण्याच्या सी डॅक या संस्थेने बनवला होता. त्याचे नाव परम दहा हजार असे होते. त्याच्या पेक्षा सागा 220 सुपर कॉम्प्यूटरचा वेग जास्त आहे. सागा हा एका सेकंदात 220 ट्रिलियन, म्हणजे बावीस हजार अब्ज, गणिती समीकरणं सोडवू शकतो. याची किंमत चौदा कोटी रुपये असुन, तो 150 किलो वॅट वीजेवर चालतो. यामुळे अंतराळ संशोधनाला मोठी मदत होणार आहे.

close