राजकारणाने पळवलं गावाचं पाणी

May 3, 2011 10:17 AM0 commentsViews: 1

03 मे

राजकीय सुडापोटी गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईनच तोडून टाकण्याचा प्रकार कोकणातील दापोली तालुक्यात घडला आहे. दापोलीमधील वाघवे आणि म्हैसाळ या दोन गावात सध्या पिण्याच्या पाण्यावरून जोरदार राजकारण सुरू आहे.

राष्ट्रवादीकडे असणारे म्हैसाळ गाव शिवसेनेकडे गेल्यामुळे स्थानिक राष्ट्रवादीच्या पुढार्‍यांनी पाणी पुरवठा योजनेच्या मूळ ठरावातच खाडाखोड करून घेऊन म्हैसाळ गावचा पाणीपुरवठाच तोडून असल्याचा आरोप करण्यात येतोय. त्यामुळे म्हैसाळ मधील ग्रामस्थ संतप्त झाले असून या गावात सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

पाईप लाईन तोड्णार्‍यांना अटक व्हावी आणि पुन्हा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी म्हैसाळवासीय आता दापोलीच्या प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. तर दुसरीकडे शासनाच्या भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत मंजूर झालेली पाणी योजना ही दोन गावासाठी असली तरीही म्हैसाळने त्यांच्या जुन्या योजनेतून पाणी घ्याव असा आग्रह वाघवे ग्रामस्थांनी धरला आहे.

close