योजना बंद सांगून शेकडो आरोग्य सेविकांना कामवरून काढलं

May 3, 2011 6:00 PM0 commentsViews: 11

03 मे

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत गेली तीन वर्ष कार्यरत असलेल्या राज्यातील शेकडो आरोग्य सेविकांना ही योजना बंद झाल्याचे कारण सांगत कामावरून कमी करण्यात आलंय. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 800 हून अधिक सेविकांना याचा फटका बसला आहे.

केंद्र सरकारच्या या योजनेची मुदत 2012 पर्यंत असून केवळ राज्याच्या आरोग्य विभागाने आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण केल्या नाहीत. त्यामुळे आरोग्यसेविकांचा बळी दिला जात असल्याचा आरोप नर्सेसनी केला.

या आरोग्य सेविकांना सरकारी आरोग्य उपकेंद्रात वर्षातून किमान पाच प्रसुती केसेस दाखल करण्याचे उद्दीष्ट देण्यात आलं होतं . मात्र अनेक गावात सरकारची आरोग्य उपकेंद्रच नसताना अशा केसेस कशा काय दाखल करायच्या असा सवालही या नर्सेसनी केला आहे.

close