असा पिकतो शिंगाडा

November 10, 2008 5:42 AM0 commentsViews: 285

10 नोव्हेंबर, चंद्रपूरचंद्रपूर जिल्ह्यातील भिसी गावचे शिंगाडे सर्वत्र पसिद्ध आहेत. जवळपासच्या तलावांमध्ये आदीवासी ढीवर समाज पारंपारिक पद्धतीनं शिंगाड्याच पीक घेतात. पण हे पीक घ्यायला कमालीची मेहनत घ्यावी लागते. यावरच आहे आयबीएन लोकमतचा हा स्पेशल रिपोर्टदिवाळीच्या महिन्यात धोंडीबा भिसीच्या तलावावर शिंगाड्याच्या खुडपणीच्या तयारीला लागतात. शिंगाड्याच्या शेतीसाठी बरीचं कसून मेहनत करावी लागते. यासाठी तलावाच्या पाण्यात होडी टाकून त्याची वर्षभर मशागत करावी लागते. पाण्याच्या आत शिंगाडे तयार होतात. त्यावर वर्षभर या आदीवासींना लक्ष ठेवावं लागतं.कारण यावरच त्यांच घर चालतं.बर्‍याच लोकांना शिंगाड्याच्या पिकाबद्दल फारशी माहिती नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील ढीवर समाज वर्षानुवर्षे शिंगाड्याची शेती करतोय. ढिवर समाजातील महिलाही यामध्ये अग्रेसर असतात. शिंगाडे बाजारात येण्या आधी त्याच्यावर वेगवेगळे संस्कार केले जातात. ' शिंगाडे घरी आणल्यावर ते साफ करून गरम पाण्यात उकडावे लागतात. मगच ते विक्रीसाठी पाठवलं जातात ' अशी माहिती शोदाबाई यांनी दिली.इतर शहरात दहा रूपयाला डझनभर शिंगाडे मिळतात.भिसीत मात्र याचा भाव अगदी कमी आहे. भिसीचे शिंगाडे राज्यात दूरदूरच्या शहरात विक्रीला जातात. एकूणच या शिंगाड्यांची चव जितकी खास आहे, तितकीच त्यामागची मेहनतंही. कदाचित या कष्टकरी हातांची मेहनतच या शिंगाड्यांची लज्जत वाढवत असावी.

close