‘ऑपरेशन लादेन’ ही संयुक्त कारवाई नव्हती – झरदारी

May 3, 2011 10:31 AM0 commentsViews: 2

03 मे

ओसामा बिन लादेनवर काल अमेरिकेच्या सैन्याने कारवाई करून खात्मा केला. या कारवाईनंतर पाकिस्तानने आज पहिल्यांदाच अधिकृत प्रतिक्रिया दिलेली आहे. ओसामाला ठार करण्याची मोहिम ही अमेरिका आणि पाकिस्तानची संयुक्त कारवाई नव्हती असं पाकचे अध्यक्ष असीफ अली झरदारी यांनी म्हटलं आहे. ओसामावर सुरु असलेल्या कारवाईविषयी कोणतीही माहिती पाकिस्तानला नव्हती असंही त्यांनी म्हटलं आहे. पाकिस्तान आपल्या हद्दीत असलेल्या दहशतवाद्यांवर कारवाई करत नाही हा मुद्दादेखील त्यांनी खोडून काढला आहे.

close