आता बँक डिपॉझिटवर जास्त व्याज मिळणार

May 3, 2011 11:42 AM0 commentsViews: 13

03 मे

रिझर्व्ह बँकेनं सेव्हिंग बँक डिपॉझिटचा रेट साडेतीन टक्क्यांवरुन चार टक्के केला आहे. रिझर्व्ह बँकेची क्रेडिट पॉलिसी आज जाहीर करण्यात आली. त्यामुळे बँक खात्यावरील रकमेवर ग्राहकांना जास्त व्याज मिळणार आहे. असा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे बँकानाही याचा फायदा होणार आहे. बँकांचीही लिक्विडिटी यामुळे वाढणार आहे. बँकांसाठीचे व्याजदरही अर्धा टक्क्यांनी वाढवले आहे. अर्थव्यवस्थेचा दर पावणे नऊ ते सव्वा नऊ टक्क्यांच्या दरम्यान असेल असा अंदाज आरबीआयने वर्तवली आहे.

close