आयपीएलमध्ये सौरव गांगुली आला परत

May 3, 2011 5:57 PM0 commentsViews: 5

03 मे

अखेर टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुली आयपीएलच्या यंदाच्या हंगामात पुणे वॉरियर्स टीमकडून खेळणार आहे. दुखापतग्रस्त आशिष नेहराच्या जागी गांगुलीचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. अनेक दिवसांपासून सौरव आयपीएलमध्ये कोची टीमकडून खेळणार अशी चर्चा होती.

पण अखेर पुण्याच्या टीमशी त्याचा करार झाला आहे. याआधी सौरव गांगुली कोलकाता नाईट राईडर्स टीममध्ये होता.त्यांने टीमचं नेतृत्व केलं होतं. पण आयपीएल 4 साठी त्याला कोलकाताच्या टीमनंही खरेदी केलं नाही. त्यामुळे तो आणि त्याचे चाहते चांगलेच नाराज झाले होते. पुण्याच्या टीममध्ये पुनरागमन करणार्‍या दादाला आपल्या परफॉर्मन्समध्ये सातत्य टीकवण्याच्या आव्हानाला आता सामोरं जावं लागणार आहे.

close