राज ठाकरे यांना ‘पहावा विठ्ठल’ भेट

May 3, 2011 11:09 AM0 commentsViews: 5

03 मे

उद्धव आणि राज ठाकरे यांच्यातील सख्य सगळ्यांनाच माहित आहे. पण आता उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना नुकत्याच प्रकाशित झालेल्या 'पहावा विठ्ठल' हा आपला ग्रंथ भेट दिला आहे. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आकाशातून टिपलेल्या पंढरीच्या वारीतल्या छायाचित्रांचे संकलन असलेल्या 'पहावा विठ्ठल' या ग्रंथाचे प्रकाशन नुकतंच बाळासाहेब ठाकरेंच्या उपस्थितीत झालं होतं. काही मान्यवरांना शिवसेनेच्या वतीने हे पुस्तक भेट देण्यात आलंय. यात राज ठाकरेंचाही समावेश आहे.

close