कोल्हापूरमध्ये मनसेचं भाजी विक्री आंदोलन

May 3, 2011 11:25 AM0 commentsViews: 6

03 मे

मनसेच्या वतीने आज कोल्हापुरात अनोखं आंदोलन करण्यात आलं. भाजी विक्रेत्यांनी चक्क महापालिकेच्या दारात भाजी विकण्यास सुरवात केली आहे. भाजीविक्रेत्यांचे पुन्हा त्याचठिकाणी पुर्नवसन व्हावे या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं. शाहूपुरी पाच बंगला परिसरातील भाजी विक्रेत्यांना महापालिकेने आतिक्रमण केल्याच्या कारणावरून हलविलं होतं. परंतु पुर्नवसन योग्य रितीने केलं नसल्याची तक्रार भाजी विक्रेते करत होते. म्हणूनच आज पालिकेच्या दारात मनसेच्या वतीने भाजी विक्रेत्यांनी आंदोलन केलं.

close