वैमानिकांचा संप सुरूच ; 90 टक्के उड्डाण रद्द

May 3, 2011 1:15 PM0 commentsViews: 1

03 मे

एअर इंडियाच्या वैमानिकांचा संप सातव्या दिवशी देखील सुरूच आहे. या सातव्या दिवशी 90 टक्के विमान उड्डाण रद्द करावी लागली आहे. केवळ 41 विमान आज उड्डाण करु शकली. दिल्ली हायकोर्टाने पायलट असोसिएशन आणि एअर इंडियाच्या मॅनेमजेंटवर ताशेरे ओढले आहे. आता सर्वाचं लक्ष लागलय ते दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाकडे कोर्टाने कामावर रुजू होण्याचे आदेश दिले होते. मात्र संघटना या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही. या संपाचा सर्वाधिक फटका देशांतर्गत विमान वाहतुकीला बसला आहे. त्याचबरोबर आखाती देशात होणारी काही उड्डाणंही रद्द करण्यात आली आहेत.

close