अरुणाचलच्या मुख्यमंत्र्यांचा तिसर्‍या दिवशी शोध सुरूच

May 3, 2011 1:27 PM0 commentsViews: 10

03 मे

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचा शोध आता भूतानमध्ये सुरु झाला आहे. दोरजी खांडू बेपत्ता होवून आता 72 तास उलटले आहेत. अजूनही त्यांच्या हेलिकॉप्टर शोधण्यात लष्कराला यश आलेलं नाही. भूतानमध्ये 31 पथकं शोधमोहिमेत लावण्यात आली आहे.

हेलिकॉप्टरमध्ये खांडू यांच्यासह पाच जण आहेत. हेलिकॉप्टर गायब झालेला प्रदेश भूतानच्या जवळ असल्याने भारताने शोधकार्यात भूतानची मदत घेतली.भूतानच्या सीमेलगत असलेल्या 7 जिल्ह्यांमध्ये भूतानचे लष्कर आणि विशेष सात पथक शोध घेत आहे. मात्र खराब हवामानामुळे शोधकार्यात वारंवार अडथळे येत आहे. या हेलिकॉप्टरमध्ये खांडू यांच्यासह पोलिस अधिकारी, एक महिला अधिकारी आणि दोन कॅप्टन आहे. शनिवारी सकाळी हेलिकॉप्टरचा टेक ऑफ झाल्यानंतर 20 मिनिटातच त्याचा शेवटचा संपर्क झाला होता. त्यानंतर हे हेलिकॉप्टर बेपत्ता झालंय.

close