मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींना मोक्का लावण्याचा विचार

November 10, 2008 8:19 AM0 commentsViews: 5

10 नोव्हेंबर, मुंबईमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या 9 आरोपींविरुध्द मोक्का अर्थातचं राज्य संघटीत गुन्हेगारी कायदा लावण्याचा एटीएसचा विचार आहे. सरकारी वकिलांनी ही माहिती दिली. आतापर्यंत हा कायदा लावण्यात आला नव्हता.मात्र तो लावण्याचा विचार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. मेजर रमेश उपाध्याय, समीर कुळकर्णी,अजय रहिरकर,राकेश धावडे आणि जगदीश म्हात्रे अशी त्यांची नाव आहेत.मोक्का लावल्यास या आरोपींवर चार्जशीट दाखल करण्यासाठी सरकारी पक्षाला किमान 180 दिवस मिळतील. सामान्य कायद्यात आरोपींवर 90 दिवसाच्या आत चार्जशीट दाखल करावी लागते. आरोप सिध्द झाल्यास आरोपींना जास्तीत जास्त जन्मठेप तर कमीत कमी पाच वर्षाची शिक्षा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणी अटकेत असलेल्या 9 पैकी 5 जणांना आज नाशिकच्या कोर्टात हजर केलं जाणार आहे. या सर्वांची पोलीस कोठडी आज संपत आहे.

close