अजिंठा लेणी पाहा एकाच छताखाली

May 3, 2011 3:49 PM0 commentsViews: 125

02 मे

औरंगाबादमध्ये जगप्रसिध्द अजिंठा लेणी प्रदुषणमुक्त करण्यासाठी तीनशे कोटीं रूपयांचा रिप्लिका प्रोजेक्ट राबविण्यात आला आहे. या प्रयोगात लेणींच्या हुबेहुब प्रतिकृती तयार करण्यात आल्या आहे. या प्रयोगामुळे पर्यटकांना हॉटेल, थियटर आणि इतर सुविधा मिळणार आहेत. अजिंठा लेण्यांच्या या प्रतिकृती फायबरपासून तयार करण्यात आल्या आहे. वातानुकुलित सभागृहात या प्रतिकृती ठेवण्यात आल्या आहेत. पर्यटकांना प्रत्यक्ष लेण्यांवर उन्हात फार काळ थांबण्याऐवजी या प्रतिकृतीच्या माध्यमातून लेण्यांचा इतिहास कळू शकेल यासाठी हा प्रयोग राबवण्यात आला आहे. यासाठी केंद्रसरकारने निधी दिला आहे.

close