उध्दव ठाकरेंनी घेतली रमाबाईनगरवासींची भेट

May 3, 2011 4:08 PM0 commentsViews: 2

02 मे

मुंबई महानगरपालिका निवडणुकींना आता आठ महिन्यांचा अवधी उरला आहे. त्यामुळे आधीच काटावर संख्याबळ असलेल्या सत्ताधारी शिवसेनेने, भीमशक्तीचा पाठिंबा मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू केला आहे. मुंबईत भीमशक्तीची सर्वात मोठी व्होट बँक आहे, ती घाटकोपरच्या रमाबाई नगरमध्ये. त्याच ठिकाणी शिवसेना कार्यध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. त्यानंतर तेथील बाजाराच्या नुतणीकरणाची पाहणीही केली.

close