लादेननं मृत्यूपत्रात लिहलं आपल्या मुलांनी अल कायदाशी संबंध ठेवू नये !

May 3, 2011 5:44 PM0 commentsViews: 2

03 मे

ओसामा बिन लादेनने आपलं मृत्यूपत्रही तयार केल्याचं समजतंय. अल-अनबा या कुवेती वर्तमानपत्राने हे मृत्यूपत्र प्रसिद्ध केल्याची बातमी द गार्डियन या वर्तमानपत्राने दिली आहे. 14 डिसेंबर 2001 रोजी लिहिलेलं हे मृत्यूपत्र आहे. आपल्या मृत्यूनंतर आपल्या पत्नींनी दुसर्‍या व्यक्तींशी लग्न करू नये, तसेच आपल्या मुलांनी अल कायदाशी संबंध ठेवू नयेत अशी इच्छा ओसामाने मृत्यूपत्रात व्यक्त केली. अल-अनबाला हे मृत्यूपत्र कसं मिळालं हे मात्र समजू शकलेलं नाही. आपल्या कुटुंबाला पुरेसा वेळ देऊ शकलेलो नाही अशी खंत त्याने मृत्यूपत्रात व्यक्त केली.

close