कलमाडींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

May 4, 2011 9:44 AM0 commentsViews: 3

04 मे

कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी सुरेश कलमाडी यांना 18 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज कलमाडींची सीबीआय कोठडीची मुदत संपत होती. त्यामुळे सीबीआयने त्यांच्या न्यायलयीन कोठडीची मागणी केली होती. पटियाला कोर्टाने सीबीआयची मागणी मान्य केली.आणि आता 14 दिवस कलमाडींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सीबीआयची कलमाडींची चौकशी सध्या पूर्ण झाल्याने सीबीआयने, सीबीआय कस्टडीची मागणी केली नाही. तर त्यांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली.

दरम्यान, सुरेश कलमाडींना काँग्रेसमधून निलंबित केलं असलं तरी त्यांच्या समर्थकांनी आज दिल्लीत जाऊन प्रदेश काँग्रेसचे प्रभारी मोहनप्रकाश यांची भेट घेतली. कलमाडींचे कट्टर समर्थक आमदार रमेश बागवे आणि पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष अभय छाजेड तसेच अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी आज काँग्रेसच्या मुख्यालयात मोहन प्रकाश यांना भेटले.

तसेच त्यांनी पतियाळा हाऊस कोर्टात जाऊन कलमाडींचीही भेट घेतली. पुण्यासाठी कलमाडींचे योगदान मोठं आहे. ते लवकर सुटावे, म्हणून आपण प्रार्थना करतो अशी भावना यावेळेस बागवे यांनी व्यक्त केली. तर पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अभय छाजेड यांनी आश्वासन दिलं की ते शहरातील सर्व नेत्यांशी समन्वय साधतील. आगामी महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढेल, असंही छाजेड म्हणाले.

close