भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय

November 10, 2008 9:40 AM0 commentsViews: 6

10 नोव्हेंबर, नागपूरभारतीय टीमने नागपूर टेस्टमध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलियाला हरवत बॉर्डर- गावसकर ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. 209 रन्सवर ऑस्ट्रेलियन टीम ऑल आऊट झाली. नागपूर टेस्टमध्ये 172 रन्सने भारतानं ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. भारतानं ही सिरीज 2-0 अशी जिंकली आहे. सकाळपासून मॅथ्यू हेडनने आक्रमक बॅटिंग करत एक बाजू लावून धरली होती. तोपर्यंत ऑस्ट्रेलियाला आशा होत्या. पण हरभजन सिंगने त्याला एलबीडब्ल्यू आऊट केलं आणि भारताला विजयाची आशा दिसली. हेडनने 77 रन्स केले. हेडन पोठोपाठ हॅडिन चार रन्स करुन आऊट झाला आणि ऑस्ट्रेलियाची अवस्था अधिकच दारुण झाली. मिश्राच्या बॉलिंगवर सचिनने हॅडिनचा कॅच पकडला. टेस्ट क्रिकेटमध्ये सचिनचा हा शंभरावा कॅच होता. त्यापूर्वी आज सकाळी जिंकण्यासाठी 382 रन्सचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवातच खराब झाली. कॅटिच, पाँटिंग, क्लार्क आणि हसी हे त्यांचे कसलेले बॅट्समन झटपट आऊट झाले.

close