अण्णा हजारे यांनी नाकारला 1 कोटींचा पुरस्कार

May 4, 2011 10:24 AM0 commentsViews: 3

04 मे

भ्रष्टाचाराविरुद्ध रणशिंग फुंकत मैदानात उतरलेल्या अण्णा हजारेंनी आता एक कोटी रुपयांचा पुरस्कार नाकारला आहे. अण्णा हजारे यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ प्लॅनिंग ऍण्ड मॅनेजमेंटतर्फे देण्यात येणारा रविंद्रनाथ टागोर पुरस्कार नाकारला आहे. सुवर्ण पदक आणि एक कोटी रुपये असं या पुरस्काराचे स्वरूप आहे.

एवढी मोठी रक्कम माझ्या कामाची नसल्याचे सांगत अण्णांनी पुरस्कार नाकारला आहे. 10 मे राजी नवी दिल्लीत अण्णांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार होतं. या पुरस्काराची घोषणा लोकपाल विधेयकासाठी सुरु असलेलं आंदोलन संपल्यावर झाली होती.

close