सदाबहार गीतकार जगदीश खेबूडकर यांच्यावर अंत्यसंस्कार

May 4, 2011 10:36 AM0 commentsViews: 10

04 मे

ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबूडकर यांच्यावर आज कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलं. काल त्याचं कोल्हापूरच्या आधार हॉस्पिटलमध्ये मुत्रपिंडाच्या आजाराने निधन झालं होतं. आज सकाळी त्यांचं पार्थिव कोल्हापुरातील प्रायव्हेट हायस्कूलमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. यावेळी प्रामुख्याने कोल्हापूरचे शाहू महाराज, महापौर आणि स्थानिक आमदार आणि शासनाच्या वतीने जिल्हाधिकारी उपस्थित होते.

close