अण्णांच्या ट्रस्टला धर्मादाय आयुक्तांची नोटीस

May 4, 2011 10:44 AM0 commentsViews: 9

04 मे

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपाल विधेयकासाठी सुरू केलेल्या आंदोलनानंतर वेगवेगळ्या मार्गांनी अण्णांना घेरण्याचे काम सुरू आहे. त्यातलाच एक प्रकार म्हणून अण्णांच्या हिंद स्वराज ट्रस्टला धर्मादाय आयुक्तांनी नोटीस पाठवली आहे. हिंद स्वराज ट्रस्टने वेळोवेळी या धर्मादाय आयुक्तांना ऑडीट रिपोर्ट सादर केले आहेत. मात्र त्रास देण्याच्या हेतूनं ही नोटीस काढली असून हा बदनामीचा कट असल्याचे अण्णा सांगत आहेत. अण्णांनी या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचे ठरवलं आहे.

close