कचरामय गोदावरीमुळे महापौर नाराज तर आयुक्तांचे हात वर !

May 4, 2011 11:45 AM0 commentsViews: 14

04 मे

पाणवेलींचा विळखा, कुजलेला कचरा आणि साचलेला मलबा हे दृष्य आहे नाशिकमधील गोदावरीचं प्रदुषित रुप. गेल्या आठवडाभरापासून याबाबत ओरड झाल्यावर नाशिकच्या महापौरांनी गोदापात्राच्या या प्रदुषणाची पाहणी केली. प्रशासनाला वारंवार सूचना देवूनही गोदापात्राची स्वच्छता झाली नसल्याबद्दल महापौरांनी नाराजी व्यक्त केली.

तर महापौरांच्या या दौर्‍यावर उपमहापौरांनीच टीका केली आहे. गोदावरी स्वच्छतेचं काम इरिगेशन डिपार्टमेंटचं असल्याचं सांगत महापालिका आयुक्तांनी आपले हात वर केले. खरं तर, गोदापात्रात मिसळणारं महापालिकेच्या ड्रेमेजचं पाणी थांबवणे महापालिकेची जबाबदारी असताना ते सोडून यावेळीही जेसीबीने पाणवेली काढण्याचा दिखाऊ आणि खर्चिक उद्योग महापालिका प्रशासन करतंय.

close