स्वाभिमानी संघटनेच्या संघर्ष यात्रेची कोल्हापूरकडे आगेकूच

May 4, 2011 2:50 PM0 commentsViews: 20

02 मे

शेतकर्‍यांच्या हक्काचे पाणी शेतकर्‍यांना मिळाले पाहिजे या मागणीसाठी स्वाभिमानी संघटनेचे नेते खा.राजु शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष यात्रा सुरु आहे. चांदोली धरणापासून खासदार राजु शेट्टी आणि अनेक शेतकरी पायी ही संघर्ष यात्रा करत कोल्हापूरच्या दिशेने येत आहेत. तर दुसरी संघर्ष यात्रा राधानगरी धरणापासून कोल्हापूरच्या दिशेने येत आहे.

जवळपास 250 कि.मी. अंतराच्या संघर्ष यात्रे मध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले आहे. पाणी वाटपाचे निर्णय मंत्रिमंडळाला नको पिण्याच्या पाण्यानंतर शेतीच्या पाण्याला प्राधान्य द्यावे अशी मागणी या संघर्ष यात्रेतून करण्यात येते. 7 मे ला ही संघर्ष यात्रा कोल्हापुरात पोहचणार आहे.

close