वेध शेअरबाजाराचा

November 10, 2008 10:17 AM0 commentsViews: 6

10 नोव्हेंबर, मुंबईग्लोबल मार्केटसवर नजर टाकली तर सध्यातरी चांगली स्थिती आहे. 9 नोव्हेंबरला चीननं देशाच्या आर्थिक समस्येच्या काळात मदतीचं पॅकेज जाहीर केलं. तैवाननंही व्याजदर कमी केले आहेत. त्यामुळे बहुतेक एशियन इंडेक्समध्ये तेजी दिसतेय. शांघाय आणि निक्केईसारखे काही इंडेक्स उत्तम ट्रेडिंग करत आहेत. अमेरिकेतही फेडरल रिझर्व्ह बँक व्याजदर कमी करेल तसंच तिथल्या कंपन्यांना पुन्हा काही आर्थिक मदत मिळेल अशीही शक्यता आहे.त्यामुळे अमेरिकन मार्केट्सनी गेल्या शुक्रवारी पॉझिटिव्ह क्लोजिंग दिलं होतं. भारतीय शेअर मार्केटवर नजर टाकली तर सेन्सेक्सचं ओपनिंग झालंय 190 अंशांनी वर जाऊन 1054 वर. 59 अंश वर जाऊन निफ्टीचं ओपनिंग झालं 3032 वर.

close