सचिनच्या चाहत्याने बनवला सचिनचा मातीचा पुतळा

May 4, 2011 5:01 PM0 commentsViews: 2

04 मे

मुंबईकर फॅन्सचं टीमवर किती प्रेम आहे ते सिद्ध केलंय विवेक सोनावणे या तरुणाने विवेकने मुंबई टीमचा कॅप्टन सचिन तेंडुलकरचा मातीचा पुतळा बनवला आहे. आणि या पुतळ्यासाठी टीमच्या फॅन्सनीच त्याला माती पुरवली. सचिन तेंडुलकरचा हा मातीचा पुतळा मुंबई उपनगरातील एका मॉलमध्ये आयपीएल संपेपर्यंत असणार आहे. हा उपक्रम सुरु केला होता रेड एफएम या रेडिओ चॅनलने. मुंबई इंडियन्स का सबसे बडा फॅन या कार्यक्रमा अंतर्गत त्यांनी विवेकची निवड केली. आज विवेकने सचिनचा पुतळा साकारला तेव्हा त्याला प्रोत्साहन द्यायला गायक अभिजीत सावंत हजर होता. सहा तासात विवेकने हा पुतळा साकारला आहे.

close