अफगाणिस्तानमध्ये भारतीय दूतावासावर हल्ल्याची शक्यता

May 5, 2011 9:28 AM0 commentsViews: 3

05 मे

अफगाणिस्तामधील भारतीय दूतावासात हाय अलर्टवर जारी करण्यात आला आहे. दूतावासावर दशतवादी हल्ले होण्याची शक्यता असल्याचा गुप्तचर यंत्रणांनी इशारा देण्यात आला आहे. जलालाबाद. हेरात, कंधार, मजारे शरीफ इथल्या वकिलातीमध्ये अलर्ट घोषीत करण्यात आला आहे.

पाकने दहशतवाद्यांना मदत थांबवावी अन्यथा कारवाई सुरूच राहील !

पाकिस्तानला देण्यात येणारी मदत थांबवण्यात यावी असा प्रस्ताव अमेरिकेन सिनेटमध्ये सादर करण्यात आला आहे. पाकिस्तानने त्यांच्या देशात आश्रय घेतलेल्या दहशतवाद्यांवर कारवाई करावी असंही अमेरिकेने म्हटलंय. तर ओसामाचा खात्मा केल्यानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पाकिस्तानामध्ये सध्या बैठक सुरू आहे.

पाकिस्तानच्या सैन्य अधिकार्‍यांनी बोलावलेल्या या बैठकीला आयएसआयचे अधिकारीही उपस्थित आहेत. अतिरेक्यांना मारण्यासाठी यापुढेही पाकिस्तानमध्ये ऑपरेशन जेरोनिमोसारख्या कारवाया सुरू राहतील असं अमेरिकेनं स्पष्ट केलंय. ओसामाला मारण्यासाठी अबोटाबादमध्ये ऑपरेशन जेरोनिमो करण्यात आलं होतं.

यापुढे पाकिस्तातनने दहशतवाद्यांना देण्यात येणारी मदत थांबवली नाही तर ऑपरेशन जेनेरिमोसारख्या कारवाया यापुढेही सुरूच राहतील असं अमेरिकेनं म्हटलंय. अत्यंत कडक शब्दांमध्ये अमेरिकेनं हा इशारा दिला.

26/11सारखे हल्ले लंडन सह जगात इतरत्र करण्याचा इशारा

ओसामा बिन लादेननंतर आता अल कायदाची जबाबदारी अन्वर अल अवलाकी याच्याकडे सोपवण्यात आल्याच म्हटलं जातंय. ब्रिटनच्या एका वृत्तपत्रात अवलाकीनं एक ई मेल पाठवला आहे. यात 26/11च्या मुंबई हल्ल्यासारखे हल्ले लंडन सह जगात इतरत्र करण्याचा इशारा त्याने दिला आहे. हा ई मेल ब्रिटिश गुप्तचर यंत्रणेकडे पाठवण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी पाईप बॉम्ब, आत्मघाती हल्ले करण्याचा इशारा त्यानं दिला आहे.

close