मुला-बाळांशी मी चर्चा करत नाही !

May 5, 2011 9:50 AM0 commentsViews: 1

05 मे

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध सुरू असताना शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना टोला हाणला आहे. विरोध करण्याची त्यांची विचारधारा आहे. पण आपल्या वरिष्ठ मित्राशी एवढ्यात भेट झालेली नाही. मुला – बाळांशी मी असल्या गोष्टी बोलत नाही. या शब्दात शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना टोला हाणला आहे. तसेच या प्रश्नावर बाळासाहेब ठाकरे यांचीही भेट घेण्याचे संकेत पवारांनी दिलेत.मुंबईत घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

या परिषदेत शरद पवार म्हणाल्े की, महाराष्ट्रात कधीही उद्योगाला पाणी प्राधान्याने देणेच धोरण नव्हतं. आजही तसं नाही. मला आजही कळत नाही की हा वाद का उत्पन्न केला गेला. पवार कुटुंबीयांवर गेल्या अनेक वर्षापासून संशयाचे वातावरण निर्माण करणारे आरोप होतायत पण एकही आरोप आतापर्यंत सिद्ध झालेला नाही. यामुळेआपल्याला या गोष्टीची चिंता वाटत नाही असं ही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

तसेच काँग्रेस जर सोबत आले तर सोबत घेऊन लढू नाही तर स्वबळावर लढू आणि धर्मनिरपेक्ष मतांच विभागनी होऊ नये अस आमचं मत आहे काँग्रेसने काय भुमिका घ्यावी हे त्यांचा मत आहे असं मत ही शरद पवारांनी स्पष्ट केलं. तर आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांना देण्यात आलेल्या पंतप्रधान पॅकेजच्या भ्रष्टाचारासंदर्भात कृषी मंत्रालयाला राज्य सरकारने काही माहिती अद्याप कळवलेली नाही. अधिकार्‍यांची भ्रष्टाचारासंदर्भात चौकशी करु असं आश्वासन शरद पवारांनी दिलं.

close