पुणे धर्मादाय आयुक्तांनी मागितली अण्णांची माफी

May 5, 2011 10:01 AM0 commentsViews: 7

05 मे

पुणे धर्मादाय आयुक्तांने ऑडिट सादर न केल्याबद्दल नोटीस बजावल्या प्रकरणी आयुक्त कार्यालयाने अण्णा हजारे यांची दिलगीरी व्यक्त केली आहे.मात्र नोटीस पाठवण्याच्या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी अण्णा हजारे यांनी केली आहे.

अण्णा हजारे यांच्या हिंद सेवा स्वराज्य ट्रस्ट या संस्थेने 2005 ते 2007 या तीन वर्षाचा ऑडिट सादर केला होता. मात्र आयुक्त कार्यालयाने ऑडिट रिपोर्ट सादर न झाल्याच कारण देत कारणे दाखवा नोटीस बजावली होती. कार्यालयीन नजरचुकीमुळे हा प्रकार झाल्याचे सांगत धर्मादायक आयुक्तांनी हजारे यांना पत्र पाठवलंय.

या नोटीसीमागे राजकीय षडयंत्र असून या प्रकरणाची चौकशीची मागणी अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री त्याचे सचिव आणि मुख्य सचिव यांना पत्र लिहून केली आहे.

close