मोहन जोशी झाले ‘नॉट रिचेबल’

May 5, 2011 10:05 AM0 commentsViews: 7

05 मे

नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा मोहन जोशींनी आयबीएन लोकमतवर काल आमच्या प्राईम टाईम कार्यक्रमात केली होती. मात्र काल रात्रीपासून त्यांचा फोन बंद आहे. नाट्यपरिषदेच्या ऑफिसमध्येही याबाबत काहीही माहिती नाही.

नाशिकजवळ शुटिंगच्यावेळी दारु पिऊन धिंगाणा घातल्याने गावकर्‍यांनी जोशी आणि त्यांच्यासह असलेला अभिनेता चेतन दळवी यांना बेदम चोप दिला होता अशा बातम्या होत्या. याप्रकरणी मोहन जोशी यांनी पत्रकार परिषद घेऊन माफीही मागितली. जो प्रकार घडला तो ठीक नव्हता असंही त्यांनी स्पष्ट केलं. आणि पवारांनी राजीनामा मागितला तर देऊ असं ते म्हणाले होते.

पण नाट्य परिषदेचे सदस्य त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम होते. त्यानंतर आयबीएन-लोकमतवर त्यांनी राजीनामा देणार अशी घोषणा केली. पण आज मात्र त्यांचा कुठंच पत्ता नाही.

close