गोदापात्रातला पाणवेलींचा विळखा काढायला सुरुवात

May 5, 2011 10:18 AM0 commentsViews: 1

05 मे

नाशिकच्या गोदापात्रातला पाणवेलींचा विळखा काढायला आता सुरुवात झाली आहे. गोदापात्रातल्या या प्रदुषणाबद्दल आयबीएन लोकमतने आवाज उठवला होता. या प्रदुषणाची प्राथमिक जबाबदारी असलेल्या महापालिकेच्या वतीने महापौरांनी गोदापात्राच्या परिसराची पाहणी केली. प्रशासनाला वारंवार सूचना देऊनही गोदापात्राची स्वच्छता झाली नसल्याबद्दल महापौरांनी नाराजी व्यक्त केली.

तर महापौरांच्या या दौर्‍यावर उपमहापौरांनीच टीका केली. गोदावरी स्वच्छतेचं काम इरिगेशन डिपार्टमेंटचं असल्याचं सांगत महापालिका आयुक्तांनी आपले हात वर केले. खरं तर गोदापात्रात मिसळणारं महापालिकेच्या ड्रेनेजचं पाणी थांबवणं ही महापालिकेची जबाबदारी असताना ते सोडून यावेळीही जेसीबीने पाणवेली काढण्याचा दिखाऊ आणि खर्चिक उद्योग महापालिका प्रशासन करतंय.

close