मुख्यमंत्री दोरजी खांडू यांना इटानगरमध्ये आणणार

May 5, 2011 10:25 AM0 commentsViews: 1

05 मे

अरुणाचल प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचा मृतदेह इटानगरला आणण्यात येणार आहे. त्यांचा मृतदेह हेलिकॉप्टर द्वारे राजभवन इथं आणण्यात येणार आहे. त्यांच्या अंत्यसंस्काराला सोनिया गांधीही उपस्थित राहणार आहेत. तवांगजवळ लुगुतांग या भागातल्या 17 हजार फूट खोल भागात खांडू यांचा मृतदेह सापडला. सलग 100 तास खांडू यांच्या शोधासाठी मोहीम सुरू होती.

खांडू गेल्या शनिवारी तवांगहून इटानगरला निघाले होते. पण वाटेतच त्यांचं हेलिक ॉप्टर बेपत्ता झालं. या हेलिकॉप्टरमध्ये असलेले खांडूंसह 5 जणांचा मृत्यू झाला आहे. शोधपथकातल्या विमानाला या हेलिकॉप्टरमधल्या पाचही जणांचे मृतदेह दिसले. पण हा भाग अतिशय दुर्गम असल्याने प्रत्यक्ष मृतदेहापर्यंत पोहोचेपर्यंत वेळ लागल्याचे गृह मंत्रालयाने सांगितलंय.

close