बहुचर्चित बालगंधर्वचा दिमाखदार प्रिमियर

May 5, 2011 11:51 AM0 commentsViews: 4

05 मे

बहुचर्चित अशा बालगंधर्व सिनेमाचा प्रिमियर नुकताच मुंबईत पार पडला. येत्या सहा मेला हा सिनेमा रिलीज होतोय. नितीन चंद्रकांत देसाई यांची ही पहिलीवहीली मराठी निर्मिती आहे. रवी जाधव दिग्दर्शित या सिनेमात सुबोध भावे बालगंधर्वांची मुख्य भूमिका साकारतोय. तर सिनेमाचं संगीत दिलंय कौशल इनामदार याने. वडाळाच्या आयमॅक्समध्ये या सिनेमाचा प्रिमियर झाला. यावेळेस मान्यवरांनी तर या सिनेमाला पसंतीची पावती दिली. आता सामान्य प्रेक्षकांसाठी हा सिनेमा उद्या म्हणजे 6 मे ला रिलीज होतोय.

close